मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

प्रार्थना, स्तवन

आरती · मला वाटते ऋद्धपुरासी जावे

 

मला वाटते ऋद्धपुरासी जावे ।
प्रभूचरणी मस्तक हे ठेवावे ॥धृ.॥

तृषा लागली स्वामीचे तीर्थ घ्यावे ।
लडिवाळ मी मागतो प्रेम द्यावे ॥१॥

महाद्वारी उभे प्रभू चरणचारी ।
क्रीडे राजमठी त्रिपुरुषी आवारी ।
विचारूविरा उखळी गुढेयासी ।
नमस्कार माझा जडा चेतनासी ॥२॥

चिरेबंदी वाडा प्रभू राऊळांचा ।
महाद्वारी थाट चहु साधनांचा ।
सखा नांदतो देव भक्तीजनांचा ।
नमस्कार साष्टांग या राघवाचा ॥३॥