श्री दत्तराज महाराज, करितो मी आज, नमन मी तुजला ।
सुखशांती देई तू मजला ॥धृ.॥
तू पूर्ण दयेचा सागर रे । तू साह्यकारी माझा रे ।
तुजविण नसे मज, कोणी जगीया आपुला ॥१॥
तू विश्वजनाचा अधिकारी । नित भक्ताचे श्रम दुःख हारी ।
भव क्लेष दोष अपयश, नासुनी आजला ॥२॥
म्हणे दामोदर हे जगदानी । ही हाक दीनाची ऐकूनी । घे धाव पाव लवकर, नाव जाऊ दे कडेला ॥३॥