उठा उठा श्री नंदकिशोरा गोप वाट पाहाती ।
वत्स भुकेले जानुनी त्या धेनु हंबरती ॥धृ॥
मयूर पिसारा फुलवूनिया तो नांचूनी बागडतो ।
बहरलेल्या लता वेलींना पाहूनिया डुलतो ॥१॥
सप्त अश्व ते रथास जुंपूनी अरुण धाव घेई ।
उषा अबरी हळू विलसण्या डोकावून पाही ॥२॥
मुख चंद्रावरी किरण कोवळे पडले हे आता ।
जनु अधराचे चुंबन घेती तुमच्या भगवंता ॥३॥
गोरस घालूनी सुवर्ण वाटी घेऊनिया यशोदा ।
बालकृष्णासी म्हणे उठी रे आनंदाच्याकंदा ॥४॥