मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

प्रार्थना, स्तवन

आरती · दुपारची प्रार्थना

 

पांचाळेश्वरी गौतमी तटतिरी मध्यान्ह काळी प्रभू।
नित्याने करी भोजन सुरपती त्या आत्मतीर्थी विभु ।


सायंकाळ प्रवर्त्तता गत करी मातापुरी पहुड हो ।
ऐसा खेळ करी सह्याद्री शिखरी सृष्ट्यंतरी नित्य हो ।। 


मध्यान्ह काळी क्षेत्र पांचाळपूरी ।
नित्यानी येतो प्रभु रवी स्थिर काळी ।


जय जय शब्द दुंदुभी गर्जे निराळी ।
प्रसन्न दृष्टी प्रभु संत मेळी ।।