मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शिंगणापूर · दर्यापूर · अमरावती

स्थान - T:दर्यापूर D:अमरावती

स्थान क्र. 1 अवस्थान शिंगणापूर

अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शिंगणापूर हे गाव, दर्यापूर-वलगाव मार्गावर दर्यापूरहून पूर्वेस १९ कि.मी. आहे व वलगावहून नैऋत्येस २४ कि.मी. आहे. १) लाखपुरी ते शिंगणापूर (दर्यापूर मार्गे) ३१ कि.मी. २) अमरावती ते शिंगणापूर (वलगाव मार्गे) ३५ कि.मी. शिंगणापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शिंगणापूर गावाच्या मध्यभागी माळीपुरा विभागात पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: दर्यापूर | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना लाखपुरीहून शिंगणापूरला आले. त्यांचे या ठिकाणी सात दिवस वास्तव्य होते. (पू. ली. १३६ ख. प्र. स्था. पो.) बाइसा व हंसराज यांना सर्वज्ञांनी येथून श्रीक्षेत्र रिद्धपूरला पुढे पाठविले. सात दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून खोलापूरला गेले. (पू. ली. १५५)

जवळील इतर स्थाने