स्थान - T:भातकुली D:अमरावती
स्थान क्र. 1
अवस्थान/विहरण
खोलापूर
अवस्थान आणि विहरण स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
खोलापूर हे गाव, दर्यापूर-वलगाव मार्गावर दर्यापूरहून किंचित ईशान्येस २१ कि.मी. आहे व वलगावहून नैऋत्येस २२ कि.मी. आहे. १) शिंगणापूर ते खोलापूर २ कि.मी. २) अमरावती ते खोलापूर (वलगाव मार्गे) ३३ कि.मी. शिंगणापूरच्या ईशान्येस दीड कि.मी. अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर खोलापूरचे स्थान आहे. खोलापूरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खोलापूर गावाच्या पश्चिमेस अंदाजे ६०३ मीटर अंतरावर पूर्णा नदीच्या पूर्व काठी कोटेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या सभामंडपात दक्षिण बाजूस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना शिंगणापूरहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य होते. (स्था. पो. उ. खा. शा. प्र.) त्यानंतर ते येथून वाकीला गेले. येथील इतर लीळा : १) सर्वज्ञांचे शिंगणापूरला वास्तव्य असताना ते येथे विहरणासाठी येत असत. (पू.ली. १५४, १५६) २) घाटेया हरिभटांची भेट, त्यांना स्थिती देणे व त्यांच्या विनंतीचा स्वीकार करणे. (पू.ली. १५४) ३) चांगदेवभटांना स्थिती देणे. (पू.ली. १५६) ४) खडखांबुला खेळ (पू.ली. १५७) ५) चांगदेवभटांना कुकडीचा व दूरस्थ मातेचा दृष्टांत निरूपणे. (पू.ली. १५४, १५७) ६) खोलापूर येथे कोटेश्वरी सर्वज्ञांचे वास्तव्य असताना त्यांचा दररोजचा दुपारचा पूजावसर व आरोगणा शिंगणापूर येथे घाटे हरिभटांच्या घरी होत असे. सायंकाळी चांगदेवभट भिक्षा करून येत असत. रात्री सर्वज्ञांना कोटेश्वरी भिक्षांन्नाची व्याळी ( प्राशली ) होत असे. (पू.ली. १५८)