स्थान - T:भातकुली D:अमरावती
स्थान क्र. 1
वसती
आष्टी
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
वाकीहून किंचित ईशान्येस आष्टी (चिंचखेडा, हातखेडा मार्ग) ९ कि.मी. आहे. हा पायमार्ग आहे. आष्टी हे गाव, अमरावती-परतवाडा मार्गावर अमरावतीहून वायव्येस १९ कि.मी. आहे व परतवाड्याहून किंचित आग्नेयेस ३१ कि.मी. आहे. आष्टीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आष्टी गावाच्या पश्चिम विभागी उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात टाकरखेड्याहून आष्टीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. येथे आल्यानंतर बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या. 'बाबा वेचू संपला.' सर्वज्ञांनी चांगदेवभटांना आडकित्ता १६ दामाला गहाण ठेवण्यास सांगितले. बाइसा म्हणाल्या, 'बाबांना एकच आडकित्ता आहे, तो एकदा गेल्यावर पुन्हा काही परत येणार आहे?' सर्वज्ञ बाइसांना म्हणाले, 'बाई, या देवतेखाली सात लोखंडाच्या कढई द्रव्याने भरलेल्या आहेत; परंतु ते काढण्याची आमची इच्छा नाही.' मग चांगदेवभट गेले. एका वाण्याकडे सोळा दामाला आडकित्ता गहाण ठेवला. आठ दामाचे सामान घेतले. आठ दाम रोख आणले. मग बाइसांनी उपहार तयार केला. सर्वज्ञांना पूजा आरोगणा झाली. (पू. ली. १५७ ख. प्र. स्था. पो.)