स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 1
अवस्थान
अंजनगाव (बारी)
श्रीगोविंदप्रभूंचे अवस्थान स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अंजनगाव, अमरावती-पाडी मार्गावर अमरावतीहून किंचित आग्नेयेस १८ कि.मी. आहे. आष्टी ते अंजनगाव (अमरावती मार्गे) ३७ कि.मी. आहे. अंजनगावला जाण्यासाठी अमरावतीहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. भुसावळ-नागपूर लोहमार्गावरील बडनेरा व चांदूररेल्वेमधील टिमटाळा रेल्वेस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर अंजनगाव (बारी) आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अंजनगावच्या नैऋत्य विभागी भवानीपुरा विभागात उत्तराभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे ब्राह्मणाचा आवार होता.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू भानखेडीहून अंजनगावला आले. त्यांचे या ठिकाणी ३ दिवस वास्तव्य होते. पूजा, आरोगणा, पहुड, उपहुड झाली. (गो. प्र. च. २३३, स्था. पो.) अवस्थान स्थानापासून वायव्येस ३ फूट ८ इंच अंतरावरील मांडलिक स्थान आहे