स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 1
आसन
भानखेड
सिद्धनाथाचा चौकी आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अमरावतीहून भानखेड, छत्री तलाव मार्ग १० कि.मी. आहे व बडनेरा येथून कोटेश्वरमार्ग ६ कि.मी. आहे. अंजनगावहून भानखेड, कोटेश्वरमार्ग ६ कि.मी. आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान भानखेड गावापासून दोन कि.मी. अंतरावरील श्रीनागदेवाचार्याच्या विस्मृती ठिकाणापासून पूर्वेस १९४ फूट अंतरावर सिद्धनाथाच्या पडलेल्या देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू नांदगावपेठहून भानखेडला आले. त्यांना सिद्धनाथाच्या देवळाच्या चौकात आसन झाले. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या श्रीकराने सिद्धनाथाच्या लिंगास स्पर्श केला. नंतर ते येथून अंजनगावबारीला गेले. (ई. श्रीमाधवराज पंजाबी यांच्या जवळील हस्तलिखित स्थान पोथी.)