मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

नांदगाव (पेठ) · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 1 पूजा/आरोगणा नांदगाव (पेठ)

श्रीगोविंदप्रभूचे पूजा आरोगणा स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नांदगाव, अमरावती-नागपूर महामार्गावर रहाटगावहून ईशान्येस ८ कि.मी. आहे. अमरावती ते नांदगाव १३ कि.मी. तिवसा ते नांदगाव २८ कि.मी.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नांदगावातील मारवाडीपुरा विभागात श्री. राधाकिसन जयकिशोर सारडा यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात लिंबाच्या झाडाखाली देवळात आहे. श्रीगोविंदप्रभूच्या वेळी येथे कडतभटांचा आवार होता. त्या आवारातील हे स्थान होय.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू काटसूरहून नांदगावला आले. त्यांना मठामध्ये देव्हारचौकी तीन दिवस अवस्थान झाले. एक दिवशी श्रीप्रभूंना येथे पूजा आरोगणा झाली. (भी. प्रत, लीळा २०८, स्था. पो.) तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून मानखेड मार्गे अंजनगावबारीला गेले.

जवळील इतर स्थाने