मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

मातुळग्राम · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 1 जन्मस्थान/अवस्थान मातुळग्राम

श्रीगोविंदप्रभूचे जन्मस्थान आणि अवस्थान स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
नांदगावहून उत्तरेस मातुळग्राम (कठोरा, नांदुरा मार्गे) ८ कि.मी. आहे. अमरावतीहून पुजदा, रोहणखेडा मार्गे मातुळग्रामला जाता येते व चांदूरबाजारहून शिराळा फाटा, शिराळा, पुजदा, रोहणखेडा मार्ग मातुळग्रामला जाता येते. अमरावती ते मातुळग्राम (मार्गे कठोरा नाका, पुजदा) २५ कि.मी. आहे. रोहणखेडा ते मातुळग्राम दीड कि.मी. आहे. तसेच शिराळा, देवरा, खापरखेडा मार्गेही मातुळग्रामला जाता येते.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान नांदुरा गावाच्या उत्तरेस दीड कि.मी. व रोहणखेडा गावाच्या ईशान्येस दीड कि.मी. अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
या ठिकाणी परमेश्वर अवतार श्रीगोविंदप्रभू यांचा जन्म काण्व शाखी ब्राह्मण कुळात झाला. त्यांच्या आईचे नाव नेमाइसा व पित्याचे नाव अनंतनायक. श्रीगोविंदप्रभूच्या जन्मानंतर दोन वर्षांच्या आत त्यांच्या मातापित्याचा देहांत झाला. मग मामा-मावशीने त्यांचे संगोपन केले. वयाच्या आठव्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर मामा-मावशीने त्यांना विद्याभ्यासासाठी श्रीक्षेत्र रिद्धपूरला आणले. (ना. प्र. ली. १, पू. ली. १५, स्था. पो. मा. शा. प्रत) जन्मस्थानच्या गाभाऱ्या बाहेरील दक्षिणेचे एक स्थान व उत्तरेची दोन स्थाने निर्देशरहीत आहेत .

जवळील इतर स्थाने