स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 1
खेळ
पुजदा
गोपालमूर्तीशी खेळ करणे स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
मातुळग्रामाहून पुजदा-रोहणखेडा मार्ग ५ कि.मी. आहे. पुजदा हे गाव अमरावती-चांदूरबाजार (मार्गे कठोरा-शिरावळ) मार्गावर आहे. अमरावती ते पुजदा २१ कि.मी. आहे. पुजद्याला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. गावामध्ये गोपीराज मठ व महानुभाव आश्रम आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पुजदा गावाच्या मध्यविभागी ग्रामपंचायतच्या पाण्याच्या टाकीजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. हे ठिकाण 'वैराग्यदेव संस्थान' या नावाने ओळखले जाते. देवळात प्रवेश केल्यानंतर आपणास पूर्व व पश्चिम बाजूस दोन मोठे ओटे दिसतील. त्यापैकी पश्चिम बाजूचे गोपालमूर्तीशी खेळ करणे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू शिरावळ्याहून पुजद्याला आले. त्यांच्या वेळी येथे गोपालाचे देऊळ होते. या ठिकाणी उभे राहून त्यांनी गोपालाच्या मूर्तीशी खेळ केला. (भी. प्र. ली. २०५, स्था. पो.) श्रीप्रभू संबंधित गोपालाची मूर्ती सध्या गावामध्ये गोपीराज मठात आहे.