मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

शिराळा · अमरावती · अमरावती

स्थान - T:अमरावती D:अमरावती

स्थान क्र. 1 स्पर्शणे शिराळा

लिंग श्रीकरे स्पर्शणे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शिराळा हे गाव, वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील शिराळा फाट्यापासून पूर्वेस २ कि.मी. आहे. वलगाव ते शिराळा फाटा १३ कि.मी. आहे व चांदूरबाजार ते शिराळा फाटा १५ कि.मी. आहे. पुजदा ते शिराळा ४ कि.मी. आहे. शिराळा हे बडनेरा-नरखेड रेल्वेमार्गावरील चांदूरबाजार-वलगावमधील रेल्वेस्थानक आहे.

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान शिराळा गावाच्या पश्चिम विभागी नागनाथाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: अमरावती | Distt: अमरावती
श्रीगोविंदप्रभू अंतोन्याहून शिराळा येथे आले. तळ्याच्या दक्षिण पाळीवर पालखी थांबविली आणि तेथून दुडदुड धाव घेत नागनाथाच्या देवळाच्या गाभाऱ्यात आले. नागनाथ लिंगास श्रीकरे स्पर्श केला आणि म्हणाले, "आवो मेली जाए तू यथ आहासि म्हणे." (गो. प्र. च. २२८)

जवळील इतर स्थाने