स्थान - T:अमरावती D:अमरावती
स्थान क्र. 1
आसन
अंतोर
श्रीगोविंदप्रभूचे आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
शिराळ्याहून ईशान्येस अंतोर (ब्राह्मणवाडा भगत मार्गे) ५ कि.मी. आहे. वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील शिराळा फाट्याहून (शिराळा, ब्राह्मणवाडा भगत मार्गे) अंतोरला जाता येते. अंतोरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान अंतोर गावाच्या मध्यभागी पाण्याच्या टाकीजवळ गढीवर उत्तराभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे रणराखसा काउंदरण्याचा आवार होता. त्या आवारातील उत्तराभिमुख देव्हारचौकीच्या पटीशाळेवरील हे स्थान होय. देवळात प्रवेश केल्यावर आपणास दोन ओटे दिसतील. त्यापैकी पूर्व बाजूचे आसन स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभू मातुळग्रामहून अंतोरला आले. प्रथम त्यांना येथे आसन झाले. रणराखसा काइंदरण्याने श्रीप्रभूंचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गंधाक्षता लावल्या. (क्र. प्र. ली २१९)