मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 1 चरणांकित रिद्धपूर

महाद्वारातील उंबरवटाचे स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
बेलोऱ्याहून उत्तरेस रिद्धपूर ५ किमी आहे . रिद्धपूर हे गाव , परतवाडा - मोर्शी मार्गावर चांदूरबाजारहून पूर्वेस ५ कि . मी. आहे व मोर्शीहून नैऋत्येस २५ कि . मी आहे . १) अमरावती ते चांदूरबाजार ३८ कि . मी . २) अमरावती ते रिद्धपूर ४३ कि . मी . ३) परतवाडा ते रिद्धपूर ते ३३ कि .मी . ४ ) अष्टमहासिद्धी ते रिद्धपूर ३० कि.मी . ५ ) तिवसा ते रिद्धपूर ४१ कि . मी . रिद्धपूरला जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध आहे . तिथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभव पंथीयांचे मठ आहेत व महाराष्ट्र पर्यटन विभागाचे यात्री निवासही आहे .

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उत्तराभिमुख महाद्वार मंदिरात पूर्वाभिमुख गाभाऱ्यात आहे . राजमठ , उंचमठ , व त्रिपुरुषाचा मठ या तिन्ही मठांच्या आवाराचे पूर्वीचे हे मुख्य प्रवेशद्वार होय . स्थानाच्या पश्चिम बाजूची केशवाची मूर्ती श्रीप्रभू संबंधित आहे . या स्थानास उभय अवतारांचा संबंध आहे .महाद्वाराशी संबंधित श्रीप्रभूच्या लीळा : १) उदक स्वीकार करणे, २) पूर्व दिशा अवलोकणे, ३) पश्चिम दिशा अवलोकणे, ४) पद्यासनी बैसणे, ५) चरणाचारी उभे राहणे, ६) दोन्ही दारसंका धरणे, ७) इंदाउवांवर श्रीचरण ठेवणे, ८) दरवाजाशी खेळ करणे, ९) उलटी भोंगळ काढणे, १०) उलटी खीळी काढणे, ११) दरवाजाच्या आड लपणे, १२) चहू कोपरा श्रीचरण ठेवणे, १३) दक्षिण दारसंकेला लागून असलेल्या कोनाड्यातील गणेशमूर्तीशी खेळ करणे, १४) साधाला फोडी प्रसाद दान देणे, १५) कोथळोबासांना बोलविणे, १६) खोलबुंधी घालणे, १७) तिथेच चरणाचारी उभे राहणे, १८) म्हातारे खाड झाले म्हणणे, १९) मुक्याला वाचा देणे, २०) कुमारीसी खेळ करणे, २१) बाहेरच्या पायऱ्या अनुक्रमे व्यतिक्रमे मोजणे, २२) दक्षिण दिशा अवलोकणे. (स्था. पो. उ. को. प्र.) महाद्वाराशी संबंधित सर्वज्ञांच्या लीळा : १) महाद्वाराच्या दरवाजाशी खेळ करणे, २) उजव्या व डाव्या दारसंकेशी खेळ करणे, ३) उंबऱ्यावर उभे राहणे, ४) दरवाजाच्या दोन्ही बाजूला टेकणे, ५) वरील दारसंकेतला श्रीकर लावणे. (स्था. पो. उ. प्र.)

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

जवळील इतर स्थाने