स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 6
चिन्हांकित
रिद्धपूर
वासुदेवभट दुर्वा झाला म्हणणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीगोविंदप्रभू मंदिराच्या सभामंडपाच्या वायव्य विभागी कोपऱ्यात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एके दिवशी श्रीगोविंदप्रभू येथे आले. सोबत माहादासा होत्या. या ठिकाणी पांढरे गवत उगवलेले होते. श्रीगोविंदप्रभू म्हणाले, "वासुदेवभट होता तो दुर्वा झाला" असे म्हणून त्यांनी आपल्या श्रीकराने गवताला स्पर्श केला. माहादासांनी विचारले, "वासुदेवभट दुर्वा का झाला?" श्रीगोविंदप्रभू म्हणाले, "पूर्वजन्मी त्याने पाखरू मारले. त्या पापामुळे दुर्वा झाला." (स्था. पो. गो. प्र. च. २५३)