मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 14 उखळ रिद्धपूर

उखळीचे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून वायव्येस ४ फूट ६ इंच अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
उंचमठातील चाट्यांनी श्रीप्रभूंना जेवण्याविषयी विचारले असता त्यांनी जेवण्याची इच्छा प्रगट केली. मग चाट्यांनी तेल आणि रोटी उखळीमध्ये वाढली. श्रीप्रभू चावी थुंकी करीत, आकाशकडे पाहात, आरोगणा करीत होते. आरोगणा झाल्यावर श्रीप्रभू त्रिपुरुषमठाच्या व उच्चमठाच्या सांधीकडे गेले. त्यानंतर आमचे सर्वज्ञ उखळीजवळ आले. त्यांना येथे उकड आसन झाले. सर्वज्ञ श्रीप्रभूंचा प्रसाद आरोगण करू लागले. तेव्हा चाट्यांनी सर्वज्ञांचे अगाधत्व पाहून त्यांच्यासाठी वाटीमध्ये तूप आणि तबकामध्ये रोटीच्यामधील मऊ भाग घेऊन आले आणि स्वीकार करण्याची विनंती केली. सर्वज्ञ म्हणाले, "श्रीप्रभू याला योग्य आहेत. आम्ही अयोग्य आहेत. आम्ही श्रीप्रभूंचा प्रसाद घेत आहेत." असे म्हणताच श्रीप्रभू चाट्यांची सुत बडवण्याची मोगरी घेऊन आले आणि विशेषत्व प्रकाशित म्हणून सर्वज्ञांच्या पाठीवर तीन घाय दिले. हे पाहून बाइसा मोठ्याने ओरडून म्हणाल्या, "मोठ्या बाबाने लहान बाबांना मारले." तेव्हा सर्वज्ञांनी बाइसांना गप्प राहण्यास सांगितले. सर्वज्ञ म्हणाले, "ही श्रीप्रभूंची खेळ-क्रीडा आहे." (पू. ली. १६६, स्था. पो.) अशा प्रकारे उभय अवतारांचा या स्थानास संबंध आहे. उखळीचे विशेष परमार्गी नमस्कार करण्याकरिता आलेले आहेत.

जवळील इतर स्थाने