मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 29 चमत्कार रिद्धपूर

सर्पदंश महादासाचे विष उतरविणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान उंचमठाच्या पटीशाळेवरील विनायकाशी खेळ करणे स्थानापासून किंचित वायव्येस १८ फूट ५ इंच अंतरावर मशीदीच्या आवाराच्या उत्तर-दक्षिण भिंतीला लागून आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एके दिवशी महादासा पहाटेच्या वेळी पाणी आणण्यासाठी करंड विहिरीकडे गेल्या असता तेथे त्यांना सर्पदंश झाला. तशीच पाण्याची कावड घेऊन महादासा आल्या. रायांगणात कावड उतरविली आणि बेशुद्ध होऊन खाली पडल्या. तेव्हा आबाइसा मोठ्याने ओरडल्या, "जी जी देवकी दासी सर्पदंश खादली." हे शब्द ऐकताच श्रीप्रभू माडाच्या वसतीहून येथे आले आणि कृपादृष्टीने अवलोकन करून महादासाचे विष उतरविले. (गो. प्र. च. १३१, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने