स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 32
मुंज
रिद्धपूर
बौलेयाचे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान चौक न्हाणीए स्थानापासून पश्चिमेस ७ फूट २ इंच अंतरावर खोलेश्वराच्या पटीशाळेजवळ दक्षिण बाजूस आहे. या स्थानावर पटीशाळेचा दगडी खांब आहे. पटीशाळा प्राचीन नाही.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
१) केशवनायकांच्या मुलाची मुंज, ईश्वरनायकांच्या मुलाची मुंज, वेसपंडितांच्या मुलाची मुंज, रुपनायकांच्या मुलाची मुंज, जोगनायकांच्या मुलाची मुंज, विठ्ठलनायकांच्या मुलाची मुंज व महेश्वर पंडिताची मुंज अशा एकूण सात मुंजी येथे श्रीप्रभूंच्या मांडीवर बसून झाल्या. (स्था. पो.) वैराग्यदेवांचीही मुंज येथेच श्रीप्रभूंच्या मांडीवर बसून झाली. (गो. प्र. च. २७७) २) विवाहाची प्रवृत्ती स्वीकारणे, ३) श्रीमुकुटी बाभिंग बांधणे, ४) श्रीकरी कांकण बांधणे, ५) डाउ बांधणे, ६) हळदी उटावे म्हणणे, ७) माहादासांकडून रुक्मिणी स्वयंवर गावणे, ८) धवळे ऐकणे, ९) रुक्मिणीचा राठळगणी जेवील म्हणणे, १०) चार दिवस मदना मादने स्वीकार करणे, ११) हरीमेयाचा हरीमा म्हणणे. (स्था. पो.)