स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 34
भोजन
रिद्धपूर
म्हाइंभटाते चारुवारू म्हणणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान जगतीच्या ईशान्य कोपऱ्यातील कापूर विहिरीच्या पश्चिम बाजूस ओट्यावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंच्या सेवादास्यासाठी काही द्रव्य प्राप्त व्हावे म्हणून म्हाइंभट दररोज एक प्रहर सोन्याचांदीचा व्यवसाय करीत होते. त्यानंतर ते मढाकडे येऊन मग भिक्षेला जात. गावातील लोकांना वाटत असे की, हे सोनार भिक्षेचे अन्न थोडेच खात असतील? हे राउळांच्या गाईला नेऊन घालत असतील. म्हणून ते भिक्षेच्या झोळीमध्ये नासलेले, विटलेले, आंबलेले, सुकलेले, खरवडलेले पदार्थ व कोडा वाढीत असत. भिक्षेहून आल्यावर म्हाइंभट श्रीप्रभूंना झोळी दाखवून आडाच्या काठी जेवायला बसत. सर्व पदार्थ एकत्र कालवून जेवण करीत. त्या वेळी श्रीप्रभू येथे येऊन म्हाइंभटांना चारुवारू म्हणायचे. असे दररोज करीत असत. (गो. प्र. च. २५०, स्था. पो.)