स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 38
सेवा
रिद्धपूर
माहादासाच्या रंगमाळिका चुकविणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीगोविंदप्रभू मंदिराच्या उत्तराभिमुखातून बाहेर येताच डाव्या बाजूस (पश्चिम बाजूस) आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
माहादासा जालन्याहून श्रीप्रभूंच्या सान्निध्यात आलेल्या होत्या. श्रीप्रभू नगरामध्ये खेळ-क्रीडा करण्यासाठी जात असत. रस्त्याने जाताना त्यांच्या श्रीचरणाला खडे रुतू नयेत म्हणून माहादासा रस्ते झाडून स्वच्छ करीत. जगतीच्या उत्तर दरवाजापुढे सडा घालून रांगोळ्या काढीत. श्रीप्रभू खेळ-क्रीडा करून आल्यावर त्या रांगोळीवर श्रीचरण न देता रांगोळी चुकवत चुकवत मठामध्ये प्रवेश करीत. अशा प्रकारे जोपर्यंत माहादासा श्रीप्रभूंच्या सान्निध्यात होत्या, तोपर्यंत दररोज ही सेवा करीत होत्या. (गो. प्र. च. ९०, स्था. पो.) रंगमाळिका चुकविणे स्थानापासून पश्चिमेस ६६ फुट अंतरावरील जगतीच्या उत्तर भिंतीतील स्थान निर्देशरहित आहे