स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 39
प्रसूती-सेवा
रिद्धपूर
बाळांतपण करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीपाचराउत बाबांच्या मठात दक्षिण बाजूच्या ओसरीवर उत्तराभिमुख देवळात आहे. (मठात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला)
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एकटी एक बाई होती. ती गरोदर होती. स्वतःच्या पतीशिवाय तिच्या घरी लहान-थोर कुणीच माणसे नव्हती. ती बाळंत होण्याची वेळ जवळ आलेली होती. तिने मनोरथ केला की, राउळ मायबाप आहेत, ते जर येतील, तर माझे बाळांतपण करतील. असा मनोरथ करताच, अंतर्यामी श्रीप्रभू येथे येऊन पोहोचले व त्यांनी त्या बाईचे बाळांतपण केले. १२ दिवसांपर्यंत श्रीप्रभूंनी बाळांतपणाची सर्व कामे केली. (गो. प्र. च. ७२, स्था. पो.)