स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 43
अवस्थान
रिद्धपूर
श्रीगोविंदप्रभूचे अवस्थान स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिकोपाध्यांच्या आवारातील मंदिराच्या मध्यभागी चार खांबांमध्ये आहे. तिकोपाध्यांच्या आवाराच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीगोविंदप्रभूंचे येथे ६० वर्षे वास्तव्य होते. (स्था. पो. उ. शा. प्र.) येथील इतर लीळा : १) आमच्या सर्वज्ञांनी याच ठिकाणी श्रीप्रभूंना वस्त्र समर्पण केले. २) बाइसा सर्वज्ञांच्यासोबत पैठणहून रिद्धपूरला आल्या, तेव्हा येथेच श्रीप्रभूंच्या ठायी पूजावसर करून त्यांना आरोगणा देत असत. (पू. ली. १६७, स्था. पो.) ३) आबाइसा, म्हाइंभट, उपाध्ये, भटोबास, माहादासा, दादोस या सर्वांची भेट येथे झाली. (स्था. पो.) ४) माहादासाचे अमृतफळ व धिरडे आरोगण करणे. (स्था. पो.) ५) म्हाइंभटांनी आणलेला गूळ आरोगण करणे. (गो. प्र. च. ९७, स्था. पो.) ६) न पुसत माहादासी श्रीप्रभूच्या श्रीमुगुटी तेल ओळगविणे. (स्था. पो.) ७) पासवडी चोरी नेली म्हणणे. (स्था. पो. दे. प्र.) ८) तिकोपाध्यांच्या पत्नीचा सर्पनिमित्ते मृत्यू सुचणे. (गो. प्र. च. ८१, स्था. पो.) ९) उपाध्यांनी आणलेले आंबे आरोगणे. (पू. ली. ४१५, स्था. पो.)