मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 51 अवस्थान रिद्धपूर

उडीवा अवस्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिरडी बांधणे स्थानाच्या ईशान्येस पश्चिमाभिमुख देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे तिकोपाध्यांचा उडीवा होता. उडीवा म्हणजे गाईंच्या ठेवण्यासाठी तयार केलेले कुडाचे घर.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
उडीव्यामध्ये श्रीप्रभूंचे १२ वर्षे वास्तव्य होते. एक दिवस मध्यरात्री श्रीप्रभूंच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडला. तो आकाशापर्यंत वाढला. तिकोपाध्यांच्या बायकोला वाटले, उडीव्याला आगच लागली. म्हणून तिने तिकोपाध्यांना सांगितले. तिकोपाध्ये धावत येऊन पाहतात तो श्रीप्रभूंच्या श्रीमूर्तीपासून प्रकाश पडलेला पाहिला आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी श्रीप्रभूंना दंडवत घातले व जवळ जाऊन पटीशाळेवरील ओट्यावर झोपण्याची विनंती केली. तेव्हापासून श्रीप्रभू पटीशाळेवरील ओट्यावर राहू लागले. (गो. प्र. च. १५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने