स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 55
भोजन
रिद्धपूर
श्राद्धी आरोगणा करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीतळेगावकर बाबांच्या मठात पूर्व-पश्चिम, दक्षिणाभिमुख ओसरीवर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
प. म. श्रीतळेगावकर बाबांचा मठ म्हणजे श्रीप्रभूंच्या वेळचा तिकोपाध्यांच्या जावयाचा आवार होय. त्या आवारात एका म्हातारीचे लहान घर होते. तिच्या घरी श्राद्ध होते. तेव्हा श्रीप्रभू येथे आले. घरात ब्राह्मण बसलेले होते, म्हणून श्रीप्रभू बाहेरच बसले आणि म्हणाले, "आवो ! सोन्याचा भात आण." म्हातारी म्हणाली, "आणित आहे." मग ब्राह्मणांनी वैदिक मंत्र म्हणून संकल्प सोडला. म्हातारीने श्रीप्रभूंना राळ्याचा भात वाढला. म्हातारी म्हणाली, "मी गरीब आहे. माझ्याजवळ तांदूळ नाही." श्रीप्रभू म्हणाले, "आवो! मेली जाय: सोन्याचा भात." अशा प्रकारे श्रीप्रभूंनी राळ्याच्या भाताला सोन्याच्या भाताची उपमा देऊन यथेच्छ आरोगणा केली. (गो. प्र. च. ३०, स्था. पो.)