स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 63
चमत्कार
रिद्धपूर
मृत वत्स जीववणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान टेकाळी उतरता भटा थापा हाणणे स्थानापासून किंचित नैऋत्येस १० फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एका माणसाचे वासरू मरण पावले. ते येथे आणून टाकले. त्या माणसाच्या घरी श्रीप्रभू गेले. तेव्हा तो माणूस श्रीप्रभूंना म्हणाला, "एक गाय होती. तिचे वासरू मरण पावले. गाय दूध देत नाही. आता मुलेबाळे दुधाशिवाय काय करणार?" मग श्रीप्रभू येथे मेलेल्या वासरापाशी आले. त्याला खडा मारला आणि ते वासरू जीवंत होऊन घरी गेले. त्या घरातील सर्वांना आनंद झाला. (गो. प्र. च. ५७, स्था. पो. उ. को. खा. द. दे. प्र.)