मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 64 वृक्षारोपण रिद्धपूर

उपटून कोहळी लावणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान त. भीमबाई जामोदेकर यांच्या मठात पश्चिमेकडील उत्तराभिमुख खोलीत आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
येथे एका ब्राह्मणाचे घर होते. त्या घरावर कोहळीचा वेल होता. तो वेल श्रीप्रभूंनी उपटला. तेव्हा त्या ब्राह्मणाची मुलगी धाइ म्हणाली, "आहा राउळो! फळते फुलते झाड का उपडिले." तेव्हा श्रीप्रभूंनी तिच्याही पायाला धरून ओढले. वेल पेवात नेऊन टाकला. तिसऱ्या दिवशी श्रीप्रभू पुन्हा आले. वेल पेवातून काढला आणि काडीने माती उकरून सुकलेला वेल लावला. रांजणातले तीन ओंजळी पाणी घातले. घरातली माणसे श्रीप्रभूंना म्हणू लागली, "हा वाळलेला वेल आता कोठून लागणार!" श्रीप्रभू काही न बोलता निघून गेले. सकाळी पाहतात तो फळाफुलांनी वेल बहरून आलेला होता. हा चमत्कार पाहून घरातील सर्वांना आश्चर्य वाटले. (गो. प्र. च. ५८, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने