स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 65
वस्त्रपूजा
रिद्धपूर
श्रावणीए वस्त्रपूजा स्वीकार स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान प. म. श्रीदर्यापूरकर बाबांच्या मठाच्या नैऋत्येस उत्तराभिमुख देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे श्रावणीचे देऊळ होते.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी केशवनायकांनी मुलांकडून श्रीप्रभूंना येथे बोलावून आणले. त्यांना बसण्यासाठी आसन रचले. श्रीप्रभू आसनावर बसल्यावर केशवनायकांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गंधाक्षता लावल्या. जानव्याचा जोड आणि सोळा हात लांबीचे तलम रेशमी वस्त्र श्रीप्रभूंना अर्पण केले. अशा प्रकारे प्रतिवर्षी केशवनायक येथे श्रीप्रभूंच्या ठायी पर्वणी करीत असत. (गो. प्र. च. ३५, स्था. पो.)