स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 72
सेवा
रिद्धपूर
म्हाइंभटा थापा हाणणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बोपा थापा हाणणे स्थानाच्या वायव्येस श्री. उत्तमराव बनसोड यांच्या घराला लागून असलेल्या पूर्वाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंचे श्रीचरण मातीने भरलेले होते म्हणून म्हाइंभटांनी एका बाईंची घागर मागून पाण्याने भरून आणली व श्रीप्रभूंचे श्रीचरण धुतले. श्रीचरण धुतून झाल्यावर श्रीप्रभूंनी म्हाइंभटांना थापटा मारला. म्हाइंभट म्हणाले, "आता श्रीचरण स्वच्छ झाले. आता का मारत नाही?" तेव्हा श्रीप्रभूंनी "आवो मेला जाय" म्हणून हास्य केले. (गो. प्र. च. १७०, स्था. पो.)