मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 78 अवस्थान रिद्धपूर

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे अवस्थान स्थान (भैरव बुरुज)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान ब्राह्मणा मार्ग सांगणे स्थानाच्या उत्तरेस 'भैरव बुरुज' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाकडे चढून जाण्यासाठी दक्षिण बाजूने ३६ पायऱ्या आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पैठणहून रिद्धपूरला श्रीप्रभूंच्या भेटीला आले होते. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी २० दिवस वास्तव्य होते. (पू. ली. १६६, १६८, स्था. पो.) येथील इतर लीळा : १) प्रतिदिनी श्रीप्रभूंचा प्रसाद आरोगणे. (स्था. पो.) २) हंसराजाशी श्रीप्रभूंच्या सेवेसाठी राहणे. (पू. ली. १६८, स्था. पो. दे. प्र.) ३) येथेच श्रीप्रभूंनी आमच्या सर्वज्ञांच्या श्रीमूर्तीशी खेळ केला. (पू. ली. १६८, स्था. पो.) अशा प्रकारे या स्थानास उभय अवतारांचा संबंध आहे.

जवळील इतर स्थाने