मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 98 क्रीडा रिद्धपूर

लक्ष्मण विहिरीशी खेळ करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान राम विहिरीशी खेळ करणे स्थानापासून उत्तरेस ६२ फूट अंतरावर देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
पश्चिम बाजूची उत्तर-दक्षिण दोन स्थाने राम-लक्ष्मण विहिरीशी खेळ करणे स्थाने होत. राम-लक्ष्मण हे दोघे भाऊ. रामाने विहीर खांदली; पण तो लक्ष्मणाच्या गुरांना पाणी पिण्यास देत नसे. मग लक्ष्मणाने श्रीप्रभूंना विनंती केली. तेव्हा श्रीप्रभूंनी त्याला जागा दाखविली. लक्ष्मणाने विहीर खांदली व त्यास 'लक्ष्मण विहीर' असे नाव ठेवले. या दोन्ही विहिरींच्या पाण्याशी श्रीप्रभू खेळ करीत असत. विहिरीच्या काठावर त्यांना आसन होत असे. श्रीप्रभू या विहिरीचे नाव त्या विहिरीला त्या विहिरीचे नाव या विहिरीला ठेवीत. (क्र. ९३, क्र. प्र. स्था. पो. उ. प्र.) एखाद्या वेढेस श्रीप्रभू या दोन्ही विहिरीत धोतरेही धूत असत. (गो. प्र. च. ४५) या दोन्ही विहिरी काळाच्या ओघात बुजून गेल्या.

जवळील इतर स्थाने