स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 113
भेट
रिद्धपूर
आळंदी दोही देवा भेटी स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पेंडीए गमन स्थानापासून पूर्वेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर काशी नदीच्या काठी उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पैठणहून रिद्धपूरला श्रीप्रभूंच्या भेटीकरिता आले, त्या वेळी श्रीप्रभू दोन्ही आळंदीमध्ये वेळ करीत होते. वेळ करीत असताना येथे श्रीप्रभूची व सर्वज्ञांची भेट झाली. सर्वज्ञांनी पुष्टीविभागी क्षेमलिंगन दिले; परंतु श्रीप्रभूंना ते मानवले नाही. श्रीप्रभूंनी दोन्ही श्रीचरण जमिनीवर आपटले. जमिनीवरचे दगड घेऊन जमिनीवर आदळले. आमच्या सर्वज्ञांनी श्रीप्रभूंच्या श्रीचरणाखालील रज आपल्या श्रीमुगुटी घातली. मग श्रीप्रभू, आमचे सर्वज्ञ, बाइसा, हंसराज, चांगदेवभट मठाकडे गेले. (पू. ली. १६५, स्था. पो.)