स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 114
घर
रिद्धपूर
वोडण झडपाच्या आवारातील स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आळंदी स्थानाच्या पूर्वेस अंदाजे ३०१ मीटर अंतरावर प. म. श्रीतळेगावकर बाबांच्या मठाच्या नैऋत्येस दोन रस्त्यांच्या मध्यावर उत्तराभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
रिद्धपूरमध्ये सर्वज्ञांच्या घरी श्रीप्रभू जात असत, परंतु वोडण झडपाच्या घरी कधीच जात नव्हते. एके दिवशी श्रीप्रभू वोडण झडपाच्या घरी गेले. सोबत भटोबास आणि म्हाइंभट होते. वोडण झडप घरी नव्हते. दरवाजात वोडण झडपाची बायको उभी होती. तिला श्रीप्रभूंनी थापटा मारून बाजूला केले. घरात जाऊन तीळ, तांदूळ, गहू, ज्वारी, उडीद, चवळी इत्यादी धान्यांनी भरलेले डेरे माजघरात आणून फोडले. सर्व धान्ये एकत्रित केली. तेवढ्यात वोडण झडप आले. ते जातीने राजपूत व अत्यंत कडक स्वभावाचे असल्यामुळे भटोबास व म्हाइंभट भिऊ लागले. ते घरात गेल्यावर श्रीप्रभू घरातून जाऊ लागले. तेव्हा वोडण झडप आड पडले. श्रीप्रभूंना विनंती केली. मग बाजसुपवतीवर श्रीप्रभूंना आसन झाले. वोडण झडपाने बाजारातून सर्व साहित्य आणले. त्यांच्या पत्नीने स्वयंपाक केला. श्रीप्रभूंना मदना-मादने झाले. वोडण झडपाने श्रीप्रभूंची पूजा केली. वस्त्र अर्पण केले. मग ताट वाढले. श्रीप्रभूंनी आरोगणा केली. भटोबास व म्हाइंभटही जेवले. नंतर श्रीप्रभू मठाकडे गेले. (क्र. च. २३३, क. प्र. स्था. पो.)