स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 117
विहीर
रिद्धपूर
मातांग विहीर स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
ही विहीर बेलोरा महाद्वार स्थानापासून दक्षिणेस अंदाजे २०१ मीटर अंतरावर बेलोरा रस्त्याच्या पूर्व बाजूस व बडनेरा-नरखेड रेल्वेमार्गाच्या दक्षिणेस आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
रिद्धपूरातील महाजनांच्या आदेशानुसार महार आणि मांग यांची घरे गावाच्या दक्षिण महाद्वाराच्या बाहेर बांधल्यानंतर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे फार हाल होऊ लागले. मग एक दिवस श्रीप्रभू या परिसरात आले असताना एका मातंगाने श्रीप्रभूंना विनंती केली की, "आम्ही पाण्यावाचून मरत आहेत, तर आता काय करावे?" तेव्हा श्रीप्रभूंना त्यांची कीव आली व त्यांनी ही जागा आपल्या श्रीचरणाने दाखविली आणि खणण्यास सांगितले. खणल्यानंतर भरपूर पाणी लागले. मग ते सर्वजण म्हणू लागले, "राऊळ मायबाप आहेत. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्ही पाणी पित आहेत." (गो. प्र. च. ४८, स्था. पो.)