स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 123
बाललीळा
रिद्धपूर
पखालीमध्ये बाळक लपविणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्रीचरणा तुळसी वाहणे स्थानापासून किंचित वायव्येस ८८ फूट अंतरावर आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एका घरची एक बाई, तिला पाणी आणण्यासाठी जायचे होते. घरात कुणी लहान-मोठे माणूस नव्हते. तेवढ्यात श्रीप्रभू येथे आले. त्या बाईने श्रीप्रभूंना विनंती केली, "तुम्ही थोडा वेळ माझ्या लेकराला खेळवा, मी घागरभर पाणी घेऊन येईन." श्रीप्रभूंच्या जवळ मूल देऊन ती बाई पाण्याला गेली. श्रीप्रभूंनी त्या बाळकाला थोडा वेळ खेळविले. मग खुंटीची पखाली काढली. एका बाजूवर बाळकास निजविले; व दुसरी बाजू पांघरवून श्रीप्रभू निघून गेले. (गो. प्र. च. ७, स्था. पो.)