मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 124 दान/चमत्कार रिद्धपूर

म्हातारीशी बाळक दान देणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पखालीमध्ये बाळक लपविणे स्थानापासून किंचित वायव्येस ३० फूट अंतरावर आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एका घरचे लेकर श्रीप्रभू नेहमी खेळवीत असत. ते लेकर एके दिवशी मरण पावले. त्याचा अंत्यसंस्कारही करण्यात आला. त्यानंतर श्रीप्रभू त्या घरी गेले असता, घरातील सर्वजण रडू लागले आणि श्रीप्रभूंना म्हणू लागले, "ज्या बाळकाला तुम्ही रोज खेळवीत होते, ते आजच मरण पावले." त्यांचे सर्वांचे दुःख पाहून श्रीप्रभूंना कीव आली. त्या बाळकाला आणण्याची श्रीप्रभूंनी इच्छा प्रगट केली आणि ज्या ठिकाणी त्या बाळकाला पुरले होते, तेथे दुडदुड धावत गेले. बाळकाला उकरून काढले. त्याला झाडले-पुसले. तेव्हा बाळक आनंदाने इकडे-तिकडे पाहू लागले. मग घेऊन आले. ते पाहून त्या घरच्या लोकांनी "शव परत घेऊन जा" असे श्रीप्रभूंना सांगून घराचा दरवाजा लावून घेतला. तेव्हा त्याच घराशेजारी येथे एक म्हातारी राहात होती. तिला श्रीप्रभूंनी ते बाळक दान दिले. (गो. प्र. च. ८, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने