स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 125
दान/उपकार
रिद्धपूर
ब्राह्मण घोडी घेववणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान म्हातारीशी बाळक दान देणे स्थानाच्या उत्तरेस आड आहे. त्या आडाच्या पूर्वेस देवळात हे स्थान आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
श्रीप्रभूंच्या वेळी येथे एका ब्राह्मणाचे घर होते. त्या ब्राह्मणाची फार गरीब परिस्थिती होती. श्रीप्रभू त्याच्या घरी येत; परंतु श्रीप्रभूंना आरोगणा देण्यासाठीही त्याच्याजवळ काही नसे. त्या ब्राह्मणाची श्रीप्रभूंना कीव आली. श्रीप्रभूंनी त्याला घरातील भांडी विकून घोडी घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याने घरातील थाळ्या-वाट्या विकून घोडी घेतली. त्या घोडीला एक शिंगरू झाले. त्या शिंगराची फार किंमत आली. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, "राठळ मायबाप आहेत. त्यांनी घोडी घेवविली; म्हणून आमचे पाय भूर्ला लागले. हा राठळांचा प्रसाद." (ऋच. १०१, भी. प्र., स्था. पो.)