स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 128
पूजा/आरोगणा
रिद्धपूर
पूजा आरोगणा स्थान (टोकणे)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान श्री. तमिजखान यांच्या उत्तराभिमुख घरासमोर किराणा दुकानाच्या पूर्व बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे टोकणेचा आवार होता. त्या आवारातील हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
टोकणेची पत्नी सोनाइसा. तिची मुले वाचत नव्हती. एक दिवस टोकणेच्या घरी श्रीप्रभूंना मादने झाल्यानंतर त्यांनी सोनाइसाला पडदणी दिली. त्या दिवसापासून तिला गर्भधारणा झाली. मुलगा झाल्यानंतर मोठ्या थाटामाटाने बारसे केले. चार गावच्या लोकांना भोजन दिले. त्या बारशाच्या दिवशी टोकणेच्या घरात श्रीप्रभूंना येथे पूजा आरोगणा झाली. (गो. प्र. च. ९१)