मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 131 भोजन/लीळा रिद्धपूर

बाळकांत भोजन करणे स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खीर भोजन स्थानाच्या पश्चिमेस देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
एक दिवस लहान मुले जेवण करीत असताना श्रीप्रभू येथे येऊन त्यांच्यामध्ये जेवण करू लागले. तेव्हा ती लहान मुले ओरडू लागली. मग त्या मुलांच्या आईने स्वतंत्र वाटे केले. श्रीप्रभूंनाही स्वतंत्र वाटा दिला. तरीही श्रीप्रभू मुलांच्या वाट्याचे जेवण करू लागले. मुले पुन्हा ओरडून आईला सांगू लागली, "राठळ आपला वाटा न जेवता आमचाच वाटा जेवतात." त्या मुलांची आई श्रीप्रभूंना म्हणाली, "आपला वाटा सोडून मुलांचा वाटा का जेवता?" पुन्हा श्रीप्रभू मुलांचाच वाटा जेवायचे. मग मुलांनी उभे राहून ताटे डोक्यावर घेतली. तेव्हा श्रीप्रभूंनी उभे राहून जेवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे श्रीप्रभूंनी त्यांच्या वाट्याची आरोगणा केली आणि आपला वाटा त्यांना प्रसाद म्हणून देवला. (गो. प्र. च. ५, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने