स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 132
विवाह/संकल्प
रिद्धपूर
गौरवी बैसणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान खीर भोजन स्थानापासून दक्षिणेस ४३ फूट अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एका म्हातारीचा मुलगा तापाने फार आजारी होता. तेव्हा तिने संकल्प केली की, जर माझा मुलगा वाचेल, तर त्याच्या वऱ्हाडीचा जो गौरव येईल त्याचा सन्मान मी राउळना देईन. असा संकल्प केल्यावर तो मुलगा बरा झाला. मग कितीतरी दिवसांनी त्या मुलाचा विवाह केला. गौरवाच्या दिवशी नवरी मुलीच्या वडिलांनी सन्मानपूर्वक गौरव विस्तारला. त्या ठिकाणी त्या मुलाची म्हातारी बसली व आपण केलेला संकल्प विसरली गेली. तेवढ्यात श्रीप्रभू येथे आले आणि म्हणाले, "आवो मेली जाय, उठी-उठी म्हणे; गौरवी बैसावे म्हणे." तेव्हा त्या म्हातारीला आपण केलेल्या संकल्पाची आठवण झाली. मग आपण तेथून उठली. श्रीप्रभू आसनी उपविष्ट झाले. वरमायेचा सन्मान तेवढाच श्रीप्रभूंनी स्वीकार केला. (ना. प्र. उ. ली. १६, स्था. पो.)