स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 138
पूजा/ओवाळणे
रिद्धपूर
देवता ओवाळणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान आसन स्थानापासून किंचित आग्नेयेस ३५ फूट अंतरावर देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
एके दिवशी श्रीप्रभू देवाळयाकडे विहारासाठी गेले होते. तेथे क्रीडा करीत असता रात्र झाली. तेथून श्रीप्रभू नगरामध्ये येण्यास निघाले. त्या स्थानाच्या देवता हातामध्ये कनकाचे परिएळ त्यावर रत्नांचे दीप घेऊन श्रीप्रभूंना अनुवर्जित आल्या. मग श्रीप्रभू येथे चरणाचारी उभे राहिले. या ठिकाणी देवतांनी त्यांना ओवाळले. (ना. प्र. पू. ली. ३८)