मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 146 विहीर रिद्धपूर

केशवनायकांची विहीर (सासू-सुनेची विहीर)

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान तिवसा सडकेच्या पूर्वेस आहे. या विहिरीला उत्तर बाजूने पश्चिमाभिमुख व दक्षिण बाजूने पश्चिमाभिमुख पायऱ्या आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
केशवनायकांनी पहिल्यांदा एक विहीर खणली होती; परंतु त्या विहिरीला पाणी लागले नाही. श्रीप्रभू येथे आले असता केशवनायकांनी श्रीप्रभूंना विनंती केली. मग श्रीप्रभूंनी उजव्या श्रीचरणाने या ठिकाणी जागा दाखविली व विहीर खणण्यास सांगितले. केशवनायकांनी विहीर खणल्यावर भरपूर पाणी लागले. (गो. प्र. च. १६४, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने