स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 148
भोजन
रिद्धपूर
ब्राह्मणाची शिवदेरी आरोगण करणे स्थान
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान बौद्धपुऱ्यामध्ये श्री. गणपतराव सदुजी वानखेडे यांच्या घरासमोर देवळात आहे. श्रीप्रभूंच्या वेळी येथे देवळे-तळे होते. त्या तळ्याच्या काठच्या पिंपळाच्या झाडाखाली हे स्थान होय.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
खेडचा एक ब्राह्मण रिद्धपूरला बाजारासाठी आला होता. त्याने सोबत शिदोरी आणलेली होती. त्याला वाटले, "श्रीप्रभू गावात भ्रष्टाचार करतात. तरी आपण येथेच तळ्याच्या काठी जेवण करू व मग गावात जाऊ." असे म्हणून त्या ब्राह्मणाने शिदोरी पिंपळाच्या फांदीला बांधली आणि आपण तळ्यात स्नान करू लागला. तेवढ्यात श्रीप्रभू येथे आले. शिदोरी काढून आरोगणा करू लागले. तेव्हा त्या ब्राह्मणाने पाहिले. मग म्हणाला, "राठळ मायबाप आहेत. ईश्वर आहेत." त्याने पुढे येऊन श्रीप्रभूंना नमस्कार केला. श्रीप्रभूंचा प्रसाद जेवला. नंतर श्रीप्रभू निघून गेले. (गो. प्र. च. ५५, स्था. पो.)