स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 160
आसन/संवाद
रिद्धपूर
श्रीप्रभूंचे स्थान (पिवळतळौली)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दाभेरी रस्त्याच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. उत्तर बाजूचे श्रीप्रभूंचे स्थान होय. व दक्षिण बाजूचे सर्वज्ञांचे स्थान होय .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकात दाभेरीला वास्तव्य असताना ते दररोज दाभेरीहून येथे येत असत. श्रीप्रभूही रिद्धपूरहून येथे येत. दोन्ही देवांना या ठिकाणी आसन होत असते. आमचे सर्वज्ञ श्रीप्रभूंच्या पुढे मांडखुटी आसन घालून बसत. मग दोन्ही अवतार एकमेकांमध्ये संवाद करीत. त्यानंतर श्रीप्रभू खेळत-खेळत रिद्धपूरला जात. श्रीप्रभूंची श्रीमूर्ती डोळ्यांना दिसेपर्यंत आमचे सर्वज्ञ पाहत उभे राहत असत. मग "जय-जय" म्हणून नमस्कार करून दाभेरीला जात. (पू. ली. ३८, ३९, स्था. पो.) २) आमच्या गोसावियांना श्रीप्रभूंनी थाप मारणे.