मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रिद्धपूर · मोर्शी · अमरावती

स्थान - T:मोर्शी D:अमरावती

स्थान क्र. 162 भोजन रिद्धपूर

क्षेत्र खाजे आरोगण स्थान

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान पिवळतळौली स्थानापासून नैऋत्येस अंदाजे ३०१ मीटर अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे. या स्थानास उभय अवतारांचा संबंध आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

स्थान Lila

स्थान | Taluka: मोर्शी | Distt: अमरावती
सारंगो नावाचा मातंग आपल्या शेतातील पदार्थ या ठिकाणी श्रीप्रभूंच्यासाठी ठेवत असे. एका द्रोणात हुरडा, एका द्रोणात बाजरीचा निंबू, एका द्रोणात गव्हाच्या भाजलेल्या ओंब्या , एका द्रोणात हरभऱ्याचे सोले, एका द्रोणात घोळणा, एका द्रोणात तुरीचे सोले, एका द्रोणात लाकाचे सोले, एका द्रोणात वाटण्याचे सोले, एका द्रोणात कोवळ्या काकड्या, एका द्रोणात उसाचे तुकडे आणि एका द्रोणात पाणी, अशा प्रकारे ज्या हंगामात जो पदार्थ शेतात तयार होत असते, तो तो पदार्थ सारंगो मातंग श्रीप्रभूंच्यासाठी द्रोणात भरून ठेवून त्यावर पत्रावळी झाकून ठेवीत असे. श्रीप्रभू येथे येऊन खाजे आरोगण करीत असत. द्रोणातील पाणी पीत असत. तोपर्यंत आमचे सर्वज्ञ दक्षिण बाजूस उभे राहत. त्यानंतर ते श्रीप्रभूंचा प्रसाद घेत. मग दोन्ही देवांचा प्रसाद सारंगोला मिळत असे. (पू. ली. ३९, स्था. पो.)

जवळील इतर स्थाने