स्थान - T:मोर्शी D:अमरावती
स्थान क्र. 22
आसन/उपहार
दाभेरी
आसन स्थान (वडाखाली)
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान दाभेरी गावाच्या पश्चिम विभागी मारुतीच्या देवळापुढील ओट्यावर लिंबाच्या झाडाखाली दक्षिणाभिमुख देवळात आहे.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
एके दिवशी म्हाइंभटांनी श्रीगोविंदप्रभूच्या ठिकाणी उपहार केला. उत्तम प्रकारचे पदार्थ तयार केले. पण त्यांनी मनामध्ये अशी भावना केली की मी सदैव भाग्यवान आहे. माझे हे उत्तम पदार्थ ईश्वरी प्रवेशन होत आहे आणि समाधान मानले. ते श्रीप्रभूंनी जाणले व उपहाराच्या वेळी आलेच नाही. सायंकाळ झाली. मग भटोबास, म्हाइंभट आले. त्या वेळी श्रीप्रभू येथे वडाच्या झाडाखाली बसले होते. म्हाइंभटांनी व भटोबासांनी श्रीप्रभूंना दुःखपूर्वक विनंती केली. मग श्रीप्रभू राजमठात आले व उपहाराचा स्वीकार केला. (गो. प्र. च. २७१; स्था. पो. उ. प्र.)