स्थान - T:भातकुली D:अमरावती
स्थान क्र. 1
आसन
साऊर
आसन स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
तळवेलहून नैऋत्येस पायमार्गे ४ किमी; आसेगाव-यावली मार्गावर असून वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील शिराळा फाट्यापासून पश्चिमेस ६ किमी; अमरावती ते साऊर २९ किमी; एस.टी.सेवा उपलब्ध आहे .
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान साऊर गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयावर पूर्वाभिमुख देवळात (देवळाला उत्तराभिमुखही एक दरवाजा) आहे .
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना राम्याहून साऊरला आले. आड अवलोकन केल्यावर त्यांना येथे आसन झाले. गुळळा (चूळ भरणे , विडा झाला. (पू. ली. १४३; स्था. पो.) त्यानंतर ते येथून तळवेलला गेले.