मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

रामा · भातकुली · अमरावती

स्थान - T:भातकुली D:अमरावती

स्थान क्र. 1 आसन/भोजन रामा

आसन स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
आसेगाव-यावली मार्गावर टाकरखेड्याहून वायव्येस ४ किमी; अमरावती ते रामा (थूगाव मार्गे) ३० किमी व टाकरखेडा मार्ग २८ किमी; एस.टी. बस; तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय; स्थानापासून जवळच महानुभाव मठ आहे .

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान रामा गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात (देवळाकडे चढून जाण्यासाठी पूर्व बाजूने पायऱ्या) आहेत.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भातकुली | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना थूगावहून राम्याला आले. त्यांना येथे आसन झाले. त्या वेळी गावातून एक ब्राह्मण आला. त्याने सर्वज्ञांना आरोगणेची विनंती केली. मग दहीभात घेऊन आला. सर्वज्ञांनी आरोगणा केली. गुळळा (चूळ भरणे ), विडा झाला. (पू. ली. १४२; स्था. पो.) त्यानंतर ते येथून साऊरला गेले.

जवळील इतर स्थाने