मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
Sthan Details

स्थान

थूगाव (पूर्णानगर) · भातकुली · अमरावती

स्थान - T:भातकुली D:अमरावती

स्थान क्र. 1 वास्तव्य थूगाव (पूर्णानगर)

वसती स्थान

मुख्य गावापर्यंत / पत्ता:
अमरावती-परतवाडा मार्गावर अमरावतीहून वायव्येस २७ किमी; परतवाड्याहून आग्नेयेस २३ किमी; राम्याहून नैऋत्येस ५ किमी; एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे .

स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान थूगावच्या वायव्येस ६०० मीटर अंतरावर थूगावहून येलकी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पूर्ण नदीच्या पूर्व काठी उत्तराभिमुख देवळात आहे.

स्थान Images

प्रतिमा उपलब्ध नाहीत.

स्थान Location (Google map)

या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.

स्थान Lila

स्थान | Taluka: भातकुली | Distt: अमरावती
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून श्रीक्षेत्र रिद्धपूरला जाताना वाकीहून थूगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुपारचा पूजावसर, गुळळा (चूळ भरणे , विडा व रात्रीची व्याळी गुळळा (चूळ भरणे , विडा येथेच झाला. (पू. ली. १४१; स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून राम्याला गेले.

जवळील इतर स्थाने