स्थान - T:अचलपूर D:अमरावती
स्थान क्र. 1
वास्तव्य/चमत्कार
असदपूर
वसती स्थान
मुख्य गावापर्यंत / पत्ता:
असदपूर हे गाव , आसेगाव - दर्यापूर मार्गावरील निंभारी फाट्यापासून २ कि .मी . आहे . १) आसेगाव ते निंभारी फाटा ९ कि . मी . २)अमरावती ते असदपुर ४१ कि . मी. ३)परतवाडा ते असदपुर ३४ कि .मी . आसेगाव , अमरावती - परतवाडा मार्गावर आहे . पूर्णानगर वरून किंचित नैऋत्येस असदपूर , सावळापूर , निंबारी मार्गे ११ कि. मी. आहे . असदपूरला जाण्यासाठी एस.टी सेवा उपलब्ध आहे .
स्थानाकडे जाण्याचा मार्ग:
हे स्थान असदपूर गावाच्या पूर्वेस चंद्रभागा नदीच्या काठी पूर्वाभिमुख देवळात (देवळाकडे चढून जाण्यासाठी दक्षिण बाजूने ३६ पायऱ्या) आहेत.
स्थान Images
प्रतिमा उपलब्ध नाहीत.
स्थान Location (Google map)
या स्थानाचे लोकेशन (नकाशा) अद्याप जोडलेले नाही.
स्थान Lila
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात वडनेरहून असदपूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून परत वडनेरला गेले. (पू. ली. ८३; स्था. पो.) येथील एक महत्त्वपूर्ण लीळा: सर्वज्ञांनी एका जन्मतः मुका असलेल्या मुलाला (सारंगो) वाचा दिली. त्याच्या आईने उपहार देऊन पूजा केली.